Commonwealth Games 2022: अलेक्झांडर स्टेडियममध्ये राष्ट्रकुल खेळ 2022 ला सुरूवात, पहा फोटो

बर्मिंगहॅममधील (Birmingham) अलेक्झांडर स्टेडियममध्ये एका भव्य समारंभात राष्ट्रकुल खेळ 2022 च्या (Commonwealth Games 2022) अधिकृत उद्घाटनाची घोषणा करण्यात आली. यादरम्यान अलेक्झांडर स्टेडियममध्ये (Alexander Stadium) उपस्थित असलेले प्रिन्स चार्ल्स (Prince Charles) यांनी खेळाच्या उद्घाटनाची घोषणा केली. 22 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. यावेळी अलेक्झांडर स्टेडियममध्ये 30,000 हून अधिक प्रेक्षक उपस्थित होते. कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या उद्घाटन समारंभात परेडमध्ये सहभागी होणारा ऑस्ट्रेलिया पहिला होता, राष्ट्रकुल खेळांच्या परंपरेनुसार मागील खेळांचे यजमान होते.

त्यानंतर ओशनिया प्रदेश, आफ्रिका, अमेरिका, आशिया, कॅरेबियन आणि शेवटी युरोपचे देश मैदानात उतरताना दिसले. भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग यांना ग्रँड ओपनिंग सोहळ्यात ध्वजवाहक बनवण्यात आले. अलेक्झांडर स्टेडियमवर आयोजित राष्ट्रकुल क्रीडा 2022 च्या उद्घाटन समारंभात पी.व्ही. सिंधू आणि मनप्रीत सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पोहोचला.

दुसरीकडे, पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची कर्णधार बिस्माह मारूफ हिने राष्ट्रकुल खेळ 2022 च्या उद्घाटन समारंभात तिच्या देशाचे प्रतिनिधित्व केले. या वर्षाच्या सुरुवातीला आपल्या मुलीला जन्म दिल्यानंतर बिस्माह मारूफने क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये पुनरागमन केले आहे. बर्मिंगहॅमच्या अलेक्झांडर स्टेडियममध्ये 28 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत कॉमनवेल्थ गेम्स 2022 चे आयोजन करण्यात आले आहे.  यादरम्यान 215 खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करतील, जे 19 खेळांमधील 141 स्पर्धांमध्ये भाग घेतील.