Photo Credit- X

BAN W vs IRE W 2nd ODI Toss Updates: बांगलादेश महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध आयर्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ (BAN W vs IRE W) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांचा दुसरा सामना ढाका येथील शेरे बांगला राष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आयर्लंडची कर्णधार एमी हंटरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे बांगलादेशचा महिला संघ प्रथम गोलंदाजी करेल. यासह बांगलादेशचा महिला संघ दुसरा एकदिवसीय सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे, गॅबी लुईसच्या नेतृत्वाखालील आयरिश महिला संघाला हा सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधायची आहे. (हेही वाचा:Mandla Mashimbi is New Coach of South Africa women's Team: मंडला माशिंबी दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाच्या नव्या प्रशिक्षक; डिलन डू प्रीझ यांचा राजीनामा)

आयर्लंडने नाणेफेक जिंकली

दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन

बांगलादेश क्रिकेट संघ: फरगाना हक, मुर्शिदा खातून, निगार सुलताना (कर्णधार आणि यष्टीरक्षक), नाहिदा अख्तर, शर्मीन अख्तर, फहिमा खातून, शोभना मोस्तारी, शोरना अख्तर, राबेया खान, सुलताना खातून, मारुफा अख्तर.

आयर्लंड क्रिकेट संघ: सारा फोर्ब्स, गॅबी लुईस, एमी हंटर (कर्णधार आणि यष्टीरक्षक), ओरला प्रेंडरगास्ट, लॉरा डेलेनी, लेह पॉल, उना रेमंड-होए, आर्लेन केली, अवा कॅनिंग, फ्रेया सार्जंट, एमी मॅग्वायर.