Trent Boult (PC - Twitter)

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 सीझनचा चौथा सामना सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 203 धावा केल्या होत्या. यानंतर ट्रेंट बोल्टने (Trent Boult) संघासाठी गोलंदाजीत चांगली सुरुवात केली आणि पहिल्याच षटकात 2 बळी घेतले.राजस्थान रॉयल्ससाठी गोलंदाजीची सुरुवात करताना ट्रेंट बोल्टने तिसऱ्या चेंडूवर सनरायझर्स हैदराबाद संघाचा सलामीवीर अभिषेक शर्माला त्याच्या शानदार यॉर्कर चेंडूवर त्रिफळाचीत केले.

डावखुरा फलंदाज अभिषेक शर्माकडे बोल्टच्या यॉर्कर चेंडूचे उत्तर नव्हते आणि त्याचा ऑफ स्टंप खाली पडला. यानंतर बोल्टने षटकाच्या 5व्या चेंडूवर राहुल त्रिपाठीच्या रूपाने हैदराबाद संघाला दुसरा धक्का दिला, तो स्लिपमध्ये जेसन होल्डरकडे झेल देऊन बाद झाला. पहिल्याच षटकात जिथे सनरायझर्स हैदराबाद संघाला खातेही उघडता आले नाही, तिथे संघाने 2 महत्त्वाचे विकेटही गमावले.

आयपीएल 2023 च्या मोसमात पहिला सामना खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाने चांगली सुरुवात केली आणि फलंदाजीमध्येही चमकदार कामगिरी केली. या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित झाल्यानंतर, संघासाठी सलामीला आलेल्या यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलर या जोडीने पहिल्या विकेटसाठी जलद 85 धावांची भागीदारी केली. जॉस बटलर आणि यशस्वी जैस्वाल यांच्याशिवाय राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसनच्या बॅटमधून अर्धशतकी खेळी पाहायला मिळाली.