जगातील सर्वात दुःखी" म्हणून ओळखल्या जाणार्‍या हत्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना फिलीपिन्समधील मनिला प्राणीसंग्रहालयात घडली. मनिलाचे महापौर हनी लकुना यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, या हत्तीला 'माली' नावाने ओळखले आणि संबोधले जात असे. त्याच्या वयाबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही. मात्र, तो 43 वर्षांचा असावा, असे मानले जाते. मंगळवारी दुपारी 3:45 वाजता त्याचे निधन झाले. जगातील सर्वात दु:खी हत्ती म्हणून त्याच्याकडे पाहिले जात असे. फिलीपिन्समधील मनिला प्राणीसंग्रहालयात माली हत्ती एकाकी जीवन जगत होता. ज्यामुळे त्याच्याकडे अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेतले गेले. मालीने मनिला प्राणीसंग्रहालयात अनेक दशके एकाकीपणात घालवली. (हेही वाचा, Elephants Dies Hit By Train: ट्रेनच्या धडकेत तीन हत्तींचा मृत्यू, पश्चिम बंगाल राज्यातील घटना)

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)