Elephants Dies Hit By Train: ट्रेनच्या धडकेत तीन हत्तींचा मृत्यू, पश्चिम बंगाल राज्यातील घटना

पश्चिम बंगाल ( West Bengal) राज्यातील बक्सा व्याघ्र प्रकल्प आणि राष्ट्रीय उद्यानात (Buxa Tiger Reserve and National Park) आज एका पार्सल ट्रेनला (Parcel Train) झालेल्या भीषण अपघातात तीन हत्तींना आपला जीव गमवावा (Elephants Dies) लागला.

Elephants Dies Hit By Train: ट्रेनच्या धडकेत तीन हत्तींचा मृत्यू, पश्चिम बंगाल राज्यातील घटना
Elephants | Representational image (Photo Credits: pixabay)

Train Hit Elephants: पश्चिम बंगाल ( West Bengal) राज्यातील बक्सा व्याघ्र प्रकल्प आणि राष्ट्रीय उद्यानात (Buxa Tiger Reserve and National Park) आज एका पार्सल ट्रेनला (Parcel Train) झालेल्या भीषण अपघातात तीन हत्तींना आपला जीव गमवावा (Elephants Dies) लागला. राजाभटखवा आणि कलचिनी रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या शिखरी गेटजवळ सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. मृत हत्तींमध्ये दोन प्रौढ हत्ती आणि हत्तीच्या एका बाळाचा समावेश आहे. हत्ती रुळ ओलांडत असताना अचानक पार्सल ट्रेन आली. ट्रेनने या सर्वांना धडक दिली, परिणामी त्यांचा अकाली मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी हत्तींवर उपचार करण्याचे प्रयत्न केले. परंतू, तत्पूर्वीच हत्ती मृत झाल्याचे पुढे आले.

हत्तीच्या अंगावरुन गेले ट्रेनचे चाक

दरम्यान, हत्तींना ट्रेनची धडक बसतानाच्या घटनेचे एक सीसीटीव्ही फुटेज पुढे आले आहे. ज्यामध्ये ही धडक किती भयावह होती हे स्पष्ट होते आहे. लेटेस्टली मराठी या सीसीटीव्ही फुटेजची पुष्टी करत नाही. दरम्यान, फुटेजच्या आधारे प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे की, धडक बसल्यानंतर तीन हत्तींपैकी एक हत्ती ट्रेनच्या खाली पडला. त्यामुळे चीरडला गेला. अंगावरुन ट्रेनचे चाक गेल्याने त्याच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या आहेत. उर्वरीत दोन हत्तींनाही मोठ्या प्रमाणावर जखमा झाल्याचे पाहायला मिळाले. अपघाताचे ठिकाण अलीपुरद्वार जिल्ह्यातील व्याघ्र प्रकल्पातील पश्चिम राजाभटखवा श्रेणी येथे आहे. धक्कादायक असे की, अलिकडील काही काळात रेल्वेच्या धडकेने हत्तींचा दुर्दैवी मृत्यूच्या घटना भारतात तुलनेने सामान्य झाल्या आहेत. (हेही वाचा, Elephants Incident News: झारखंडमध्ये विद्युत धक्याने दोन पिलांसह पाच हत्तींचा मृत्यू)

भारतात दरवर्षी सरासरी 20 हत्ती ट्रेनच्या धडकेचे बळी

पश्चिम बंगालच्या अलीपुरद्वार जिल्ह्यात असलेल्या चपरामरी रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये रेल्वे ट्रॅक ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना एका मादी हत्तीला मालगाडीने धडक दिली. ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला. दुर्दैव असे की, ती हत्तीण गर्भवती होती. ही घटना यावर्षाच्या या वर्षाच्या सुरुवातीलाच घडली होती. एनडीटीव्हीने आपल्या वृत्तात दिलेल्या एका सरकारी आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी सरासरी 20 हत्ती ट्रेनच्या धडकेचे बळी ठरतात. पश्‍चिम बंगालमध्ये देशातील हत्तींच्या लोकसंख्येपैकी सुमारे 2 टक्के लोकसंख्या असल्‍याने, या प्रदेशातील अनैसर्गिक हत्तींच्या मृत्यूसाठी रेल्वे अपघातांची संख्या अधिक आहे. दरम्यान, अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी सरकार सक्रियपणे प्रयत्न करत आहे. अशा घटना टाळण्यासाठी आणि असुरक्षित हत्ती लोकसंख्येचे रक्षण करण्यासाठी उपाययोजना राबवत आहे.

दरम्यान, अशाच एका घटनेत झारखंड राज्यातील पूर्व सिंगभूम येथे दोन पिल्लांसह पाच हत्तींचा मृत्यू झाला होता. विद्यूत वाहीनिच्या उघड्या तारांच्या संपर्कात आल्याने आणि विजेचा धक्का बसल्याने ही घटना घडली. ज्यामध्ये या हत्तींचा दुर्दैवी अंत झाला. ही घटना घाटशिला उपविभागाच्या जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 45 किमी अंतरावर असलेल्या मुसाबनी येथील बेनियासाई गावात घडली.

(The above story first appeared on LatestLY on Nov 27, 2023 04:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).