Al-Watan Tower in Gaza Demolished: हमासने इस्त्रायलवर हल्ला केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये युध्द सुरु झाले आहे. दोन्ही देशांकडून एकापाठोपाठ एक हल्ले होत आहे. हमासच्या हल्ल्यानंतर इस्त्रालयच्या पंतप्रधानांनीही युध्दाची घोषणा केली आहे. इस्रायलच्या युद्धाच्या घोषणेनंतर गाझामधील अल-वतन टॉवरवर हल्ला करण्यात आला आहे. ज्यामध्ये अल-वतन टॉवर कोसळला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गाझा येथील अल-वतन टॉवरवर इस्रायलने केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. इस्रायलच्या जोरदार हल्ल्यानंतर अल-वतन टॉवर जळत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तिथे इमारतीचा काही भाग कोसळला.
इस्लामिक रेझिस्टन्स मूव्हमेंट (हमास) च्या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धाची घोषणा केली आहे. इस्रायल पॅलेस्टिनी इस्लामिक रेझिस्टन्स मूव्हमेंटला (हमास) चोख प्रत्युत्तर देईल, असे पंतप्रधान नेतन्याहू यांनी त्यांच्या घोषणेत सांगितले.
WATCH: Israeli airstrike hits Al-Watan Tower in Gaza City, causing it to collapse pic.twitter.com/KrwONKe8q6
— BNO News (@BNONews) October 8, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)