अमेरिकेत 2022 मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली होती. येथे एफबीआयने एका व्यक्तीला अटक केली होती, ज्याच्या घरातून 40 मानवी सांगाडे सापडले होते. अटक केल्यानंतर या व्यक्तीवर अनेक आरोपांखाली कैक खटले दाखल करण्यात आले होते. त्यातील एका आरोपामध्ये आता न्यायालायाकडून या व्यक्तीला दोन वर्षांच्या प्रोबेशनची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जेरेमी पॉली (42) असे या व्यक्तीचे नाव असून, तो थॉम्पसनचा रहिवासी आहे. जेरेमी हा अर्कान्सास शवागार आणि हार्वर्ड मेडिकल स्कूलमधून मानवी अवशेषांची खरेदी आणि पुनर्विक्री करत असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. कोर्टाच्या कागदपत्रांनुसार जेरेमीने 8 जानेवारी 2023 रोजी दोषारोप स्वीकारला. मंगळवारची शिक्षा पॉलीच्या राज्य आरोपाशी संबंधित होती. फेडरल स्तरावर, गेल्या सप्टेंबरमध्ये त्याला 15 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

माहितीनुसार, जेरेमी हा एका भयंकर भूमिगत गटाशी संबंधित आहे, जो हार्वर्डच्या प्रतिष्ठित वैद्यकीय शाळांमधून चोरलेले मेंदू, हृदय, त्वचा आणि भ्रूणांचा व्यवहार करतो. आपला गुन्हा काबुल करताना पॉलीने आपण मानवी अवशेषांची खरेदी आणि विक्री करणाऱ्या राष्ट्रव्यापी नेटवर्कचा भाग असल्याने मान्य केले. पॉलीने हार्वर्ड मेडिकल स्कूल शवागाराच्या माजी व्यवस्थापकाकडून हे शरीराचे अवयव विकत घेतले. पॉलीने चोरीचे अनेक अवशेष इतरांना विकल्याचेही कबूल केले. (हेही वाचा: Israel-Hamas War: इस्रायल-हमास युद्धातील पॅलेस्टिनी मृतांची संख्या 30,717 वर; युद्धविराम चर्चा अनिर्णित)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)