Demi Agoglia या 26 वर्षीय ब्रिटिश महिलेला टर्की मध्ये ब्राझिलियन बट लिफ्ट सर्जरी जीवघेणी ठरली आहे. सर्जरी नंतर घरी निघण्यापूर्वी तिला छातीत दुखु लागले होते. नंतर तिला हार्ट अटॅक आला. तिला सीपीआर देऊन वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्यामध्ये यश आले नाही. बट लिफ्ट सर्जरी मध्ये शरीराच्या इतर अवयवातून फॅट्स काढून ते बट्स वर लावून Hourglass आकारात बट्स बनवले जातात. ही फॅट इम्बॉलिझम प्रक्रिया असते. या महिलेचा मृत्यू Fat embolism syndrome मुळे झाल्याचा अंदाज आहे. कारण त्यामध्ये फॅट्सचे कण रक्तवाहिन्यांमध्ये जाऊन रक्तपुरवठा खंडीत होतो.
पहा ट्वीट
UK Woman Suffers A Series Of Heart Attacks After Brazilian Butt-Lift Surgery In Turkey, Dies https://t.co/YMjatdLE8l pic.twitter.com/srQalfzCDQ
— NDTV (@ndtv) January 11, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)