Helicopter Crash In Turkey: दक्षिण-पश्चिम तुर्कीमधील रुग्णालयात रविवारी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. मुग्ला ट्रेनिंग अँड रिसर्च हॉस्पिटलमधून टेकऑफ दरम्यान हा अपघात झाला, ज्यामुळे विमानातील दोन वैमानिक, एक डॉक्टर आणि अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. दाट धुक्यात रुग्णवाहिका हेलिकॉप्टर रुग्णालयाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर जाऊन धडकले. त्यानंतर हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळले. सुदैवाने या अपघातात इमारतीच्या आत किंवा जमिनीवर कोणीही जखमी झाले नाही. मुग्लाचे प्रादेशिक गव्हर्नर इद्रिस अकबिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, दाट धुक्यामुळे हेलिकॉप्टर आव्हानात्मक परिस्थितीत कार्यरत होते. खराब दृश्यमानतेमुळे हा भीषण अपघात झाला. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे.

तुर्कीमध्ये हेलिकॉप्टर इमारतीला धडकले, पहा व्हिडिओ -

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)