North Star Mall Shooting Video: अमेरिकेत घडलेल्या एका धक्कादायक घटनेत, टेक्सासमध्ये गोळीबाराची घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. वृत्तानुसार, सॅन अँटोनियो येथील नॉर्थ स्टार मॉलमध्ये शूटिंग झाले. पोलिस अधिका-यांनी सांगितले की, यथे एका व्यक्तीला लक्ष करण्यात आले होते. दरम्यान, या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 15 सेकंदांच्या व्हिडिओ क्लिपमध्ये शॉपिंग मॉलमध्ये जीवघेणा गोळीबार झाल्यानंतर खरेदीदार नॉर्थ स्टार मॉलमध्ये संरक्षणासाठी धावताना दिसत आहेत. सॅन अँटोनियो पोलिस विभागाच्या (एसएपीडी) अधिका-यांनी सांगितले की, दोन संशयित मॉलमधील नाईच्या दुकानात गेले आणि त्यांनी पीडित व्यक्तीवर गोळ्या झाडल्या. ज्याचे केस कापले जात होते. सॅन अँटोनियो पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयितांचा शोध घेतला. (हेही वाचा - New York: महिला सहकाऱ्याचा लैंगिक छळ प्रकरणी 70 वर्षीय भारतीय व्यक्ती दोषी)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)