पाकिस्तानच्या कराचीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एआरवाय न्यूजने गुरुवारी दिलेल्या वृत्तानुसार, कराचीच्या पीआयडीसीजवळ एका महिलेने आपली ‘कार थांबवल्याबद्दल’ पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) यांच्यावर हल्ला केला तसेच त्यांना थप्पडही मारली. कराचीमध्ये रंगीत काच आणि फॅन्सी नंबर असलेल्या वाहनांविरुद्ध वाहतूक पोलिसांची कारवाई सुरू आहे. माहितीनुसार, ही घटना कराचीमधील पाकिस्तान इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनजवळील वाहतूक विभागात घडली, जिथे एका ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्याने ‘फॅन्सी नंबर प्लेट्स आणि टिंटेड ग्लास लावल्यामुळे’ ही कार थांबवली होती. याच रागातून महिलेने पोलिसांना मारहाण केली. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यामध्ये ही महिला पोलिसांसोबत धक्काबुक्की करताना दिसत आहे.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)