न्यूयॉर्कमधील मॅनहॅटन येथील 'जेंगा' टॉवरच्या 18व्या मजल्यावरून 2 सप्टेंबर रोजी एका व्यक्तीने उडी मारल्याची घटना घडली होती. आता समोर आले आहे की, या व्यक्तीचे नाव गुस्तावो अर्नाल असून तो, बेड बाथ अँड बियॉंड या यूएसस्थित रिटेल स्टोअर्सच्या चेनचा मुख्य वित्तीय अधिकारी होता. न्यूयॉर्क पोलिस विभागाच्या (NYPD) प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, 2 सप्टेंबर रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास त्यांना एका व्यक्तीने इमारतीवरून उडी मारण्यासंबंधीचा कॉल आला होता. कंपनीने आपली अंदाजे 900 पैकी 150 दुकाने बंद करण्याची आणि 20 टक्के कर्मचार्यांना काढून टाकण्याची योजना जाहीर केल्यानंतर दोनच दिवसांनी ही घटना घडली आहे.
अर्नालने कथितरित्या दोन आठवड्यांपूर्वीच USD 1 दशलक्ष मध्ये कंपनीतील 42,000 पेक्षा जास्त शेअर्स विकले, जे बर्याचदा 'मेम स्टॉक' म्हणून ओळखले जात होते. 2020 मध्ये अर्नाल बेड बाथ अँड बियॉन्डमध्ये सामील झाला होता. याआधी, तो लंडनस्थित कॉस्मेटिक्स कंपनी एव्हॉनमध्ये सीएफओ होता.
Bed Bath & Beyond CFO plunges to death at New York's Jenga tower, as per reports: Reuters pic.twitter.com/WkZsQu5Qcp
— ANI (@ANI) September 4, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)