Mauritius Grants Special Break: राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याची अयोध्येत जोरदार तयारी सुरू आहे. संपूर्ण देशात उत्सवाचे वातावरण आहे. अशात भारताचा मित्र देश मॉरिशसने शुक्रवारी (12 जानेवारी) घोषणा केली की 22 जानेवारीला देशात दोन तासांचा ब्रेक देण्यात येईल. मॉरिशस सरकारने हिंदू धर्माचे पालन करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना हा ब्रेक देण्याची घोषणा केली. मॉरिशस सनातन धर्म मंदिर फेडरेशनने नुकतेच देशाचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांना पत्र लिहिले होते, तेव्हा ही बाब समोर आली आहे. त्यात फेडरेशनने लिहिले होते की, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा हा हिंदू धर्मासाठी खूप खास दिवस आहे. अशा परिस्थितीत 22 जानेवारीला दोन तासांचा ब्रेक द्यावा, असे आमचे आवाहन आहे. त्यानंतर सरकारने ब्रेक देण्याबाबत घोषणा केली. राम मंदिराच्या ऐतिहासिक बांधकामाच्या शुभ मुहूर्तावर आपल्या हिंदू बंधू-भगिनींच्या धार्मिक भावना आणि परंपरांचा आदर करण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे मॉरिशस सरकारने म्हटले आहे. मॉरिशसमध्ये हिंदू धर्माच्या अनुयायांचा मोठा वर्ग आहे आणि त्यांच्यासाठी राम मंदिराच्या उभारणीला विशेष धार्मिक महत्त्व आहे. (हेही वाचा: Ayodhya Ram Mandir: राम लल्लाच्या प्राण प्रतिष्ठेच्या घोषणेपासून MakeMyTrip वर अयोध्येच्या सर्चेसमध्ये 1,806 टक्के वाढ)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)