PM Narendra Modi and Xi Jinping Bilateral Meeting: रशियातील कझान शहरात सुरू असलेल्या ब्रिक्स परिषदेतून मोठी बातमी समोर येत आहे. बुधवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय बैठक होणार आहे. याआधी 2020 मध्ये भारत आणि चीनमधील गलवान संघर्षानंतर भारत आणि चीनमधील संबंध तणावपूर्ण झाले होते. मात्र, आता दोन्ही देशांमधील चर्चा पुन्हा रुळावर आली आहे. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात रशियात होणाऱ्या बैठकीची माहिती दिली आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी म्हणाले की, मी पुष्टी करू शकतो की उद्या (बुधवार) पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात ब्रिक्स परिषदेच्या बाजूला द्विपक्षीय बैठक होणार आहे. भारत आणि चीन यांच्यातील दीर्घकाळापासून सुरू असलेला कटुता अलीकडच्या काळात कमी झाला आहे. अशा परिस्थितीत दोन्ही नेत्यांच्या या भेटीकडे जगाचे लक्ष असेल. याआधी सोमवारी, चीनने मंगळवारी पूर्व लडाखमधील आपल्या आणि भारतीय सैन्यादरम्यानचा संघर्ष संपवण्यासाठी नवी दिल्लीशी झालेल्या कराराची पुष्टी केली. दरम्यान, आज पुतीन यांची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांच्याशी द्विपक्षीय चर्चाही केली. परराष्ट्र सचिवांनी सांगितले की, पंतप्रधानांनी या काळात पश्चिम आशियातील परिस्थितीवर चर्चा केली. (हेही वाचा: India-China Agree on ‘Patrolling Arrangements’: एलएसीवर गस्त घालण्याबाबत भारत आणि चीन यांच्यात तब्बत 4 वर्षानंतर करार; सीमा वाद संपण्याची शक्यता)

PM Narendra Modi and Xi Jinping Bilateral Meeting:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)