नायजेरियातून एक मोठी बातमी समोर येत आहे. ओवो शहरातील सेंट फ्रान्सिस कॅथोलिक चर्चमध्ये रविवारी काही बंदूकधाऱ्यांनी अंधाधुंद गोळीबार केला. यावेळी चर्चमध्ये प्रार्थना सुरू होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बंदुकधारींनी पुजारी आणि अनेक भाविकांचे अपहरण केले आहे. मृत किंवा जखमींची संख्या अद्याप समजू शकलेली नाही, तरी या घटनेमध्ये साधारण 50 लोकांनी आपला जीव गमावला असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, ओवो राज्याचे गव्हर्नर रोटिमी अकेरेडोलू यांनी हा निष्पाप लोकांवरील भ्याड हल्ला असल्याचे म्हटले आहे. त्यांनी दोषींना कठोरात कठोर शिक्षा करण्याचे आश्वासन दिले आहे. आतापर्यंत कोणत्याही टोळीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)