Silofar Panchamrit Kalash: पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-20 परिषदेत सहभागी होण्यासाठी रविवारी संध्याकाळी नायजेरियाहून ब्राझीलला रवाना झाले. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नायजेरियाच्या राष्ट्रपतींना कोल्हापूरचा सिलोफर पंचामृत कलश भेट म्हणून दिला. हा कलश कोल्हापूरच्या पारंपारिक कारागिरीचे अप्रतिम उदाहरण आहे. हा सिलोफर पंचामृत कलश उच्च-गुणवत्तेच्या चांदीपासून बनविला गेला असून, त्याच्यावरची बारीक नक्षीकाम आणि सुबक घडणावळ हे कारागिराच्या हातची कसब दाखवतो. यावर कोल्हापूरच्या प्रसिद्ध धातूकामाचे वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम केले असून, ज्यात मुख्यत्वे फुलांचे नमुने, देवता आणि कोल्हापूरच्या पारंपरिक रचनांचा समावेश आहे. पंचामृत- दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचे पवित्र मिश्रण, देण्यासाठी कलशाचे हँडल आणि झाकण वापरण्यास सुलभ असे तयार केले आहे. (हेही वाचा: PM Narendra Modi Special Gifts For Jill and Joe Biden: चांदीची ट्रेन, पश्मिना शाल; पंतप्रधान मोदींनी जिल आणि जो बिडेन यांना दिले खास गिफ्ट)

Silofar Panchamrit Kalash:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)