Nepal Bus Accident: नेपाळ येथे एका खासगी बसचा अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे. भाविकांना घेवून जाणाऱ्या बसचा दुर्दैवी अपघात झाला आहे. या दुर्घटनेत सात जणांनी प्राण गमावले आहेत. बस चालकांचा  नियत्रंण सुटल्याने हा अपघात झाला आहे. नियत्रंण सुटल्याने बस थेट एका मोठ्या खडकावर धडकली. या घटनेत मृत्य झालेल्या सात नागरिकांपैकी सहा नागरिक हे भारतीय असल्याचे वृत्तांनी सांगितले आहे. तसेच एक नागरिक हा नेपाळचा होता. वृत्तांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागरिक हे राजस्थान जिल्ह्यातील होते. या बसचा रात्रीच्या सुमारास अपघात झाला. हा अपघात बारा जिल्ह्यातील दक्षिण भागात झाला. बस मधील इतर जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात 3 पुरुषांचा आणि 3 भारतीय महिलांचा मृत्यू झाला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या बस मध्ये 34 प्रवासी होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)