Indian Ocean Island Games 2023: इंडियन ओशन आयलँड गेम्सच्या उद्घाटन समारंभाच्या दरम्यान मादागास्कन राजधानी अंटानानारिव्हो येथील बरिया स्टेडियमच्या प्रवेशद्वारावर शुक्रवारी दुपारी झालेल्या चेंगराचेंगरीची मोठी दुर्घटना झाली. या घटनेत किमान 12 लोक ठार आणि 80 जखमी झाले.असे उपस्थित अधिकाऱ्यांनी वृत्तांना माहिती दिली. 50,000 हजारहून अधिक लोक या समांरभाच्या वेळीस उपस्थित होते. मादागास्कनच्या पंतप्रधान ख्रिश्ती एटन्से यांनी १२ लोकांचा मृत्यू झाल्याची वृत्तांना माहिती दिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जखमी झालेल्यां पैकी ११ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.
〰️ 🏟 🔗🚨 EMERGENCY #Madagascar's national stadium for the opening ceremony of the Indian Ocean Island Games has killed 12 & injured around 80, the PM said
pic.twitter.com/IEoyHDu8Vz https://t.co/hMKE4L1cMF
— A Deniz Ekşioğlu (@_AD_CHANEL6) August 25, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)