अफगाणिस्तानात तालिबानच्या राजवटीपासून बॉम्बस्फोटांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा आत्मघातकी हल्ला झाला होता. यावेळी राजधानी काबूलला लक्ष्य करण्यात आले. वृत्तानुसार, काबूलमधील एका शिक्षण केंद्रात आत्मघाती बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात 53 जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी 46 मुली आणि महिला आहेत. एएफपी न्यूज एजन्सीने यूएनच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत बहुतांश हजारा आणि शिया लोकांचा मृत्यू झाला आहे. हजारा हा अफगाणिस्तानातील तिसरा सर्वात मोठा वांशिक गट आहे. शहराच्या पश्चिमेला असलेल्या दश्त-ए-बरची भागातील काझ एज्युकेशन सेंटरमध्ये हा स्फोट झाला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)