Afghanistan Cricket Team: अफगाणिस्तान क्रिकेट (Afghanistan Cricket) संघ 2021 टी-20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेत भाग घेण्यासाठी काबूलहुन रवाना झाला आहे. आज, बुधवारी ते संयुक्त अरब अमिराती (United Arab Emirates) साठी रवाना झाले आहेत. देशात तालिबान (Taliban) राजनंतर देशातील क्रिकेट संघाच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत सहभागी होण्याबाबत मोठे प्रश्न निर्माण झाले होते. मात्र, तालिबान शासकांकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर अफगाणिस्तान बोर्डाने देशातील क्रिकेटपटूंना विश्वचषकात खेळण्याची व्यवस्था केली.
अफगाणिस्तानच्या टी-20 विश्वचषक मोहिमेला 25 ऑक्टोबरपासून शारजामध्ये सुरुवात होणार आहे. अफगाणिस्तान भारताच्या (India) गटात असून 3 नोव्हेंबर रोजी दोन्ही संघ आमनेसामने येतील.
تیم ملی کریکت افغانستان برای شرکت در جام جهانی بیست آوره، امروز کابل را به مقصد امارات متحده عربی ترک کرد. جام جهانی کریکت بیست آوره که در امارات متحده عربی و عمان برگزار خواهد شد، قرار است به تاریخ ۱۷ اکتوبر آغاز شود.#طلوعنیوز pic.twitter.com/PZAXRXwXs3
— TOLOnews (@TOLOnews) October 6, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)