Giorgia Meloni Greets PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी शुक्रवारी इटलीच्या अपुलिया येथे G7 शिखर परिषदेच्या (G7 summit) ठिकाणी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. भेटीदरम्यान, जॉर्जिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 'नमस्ते' म्हणत हात जोडून स्वागत केले. आदल्या दिवशी पंतप्रधान मोदींनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली होती. (हेही वाचा - G7 Summit: इटलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष Volodymyr Zelenskyy यांची भेट; दोन्ही नेत्यांमध्ये पार पडली द्विपक्षीय बैठक)

पहा व्हिडिओ -

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)