PM Modi Meet Ukrainian President Volodymyr Zelenskyy: पीएम नरेंद्र मोदी सध्या G-7 परिषदेत सहभागी होण्यासाठी इटलीमध्ये आहेत. यावेळी त्यांनी अनेक जागतिक नेत्यांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांचीही भेट घेतली. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली. तिसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यानंतर केलेल्या अभिनंदनाबाबत पंतप्रधानांनी राष्ट्रपती झेलेन्स्की यांचे आभार मानले. दोन्ही नेत्यांची एक फलदायी बैठक झाली, ज्यामध्ये त्यांनी द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याच्या मार्गांवर चर्चा केली. त्यांनी युक्रेनमधील परिस्थिती आणि स्वित्झर्लंडद्वारे आयोजित करण्यात येत असलेल्या शांततेवरील आगामी शिखर परिषदेवरही विचार विनिमय केला. पंतप्रधानांनी सांगितले की भारत संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून संघर्षाच्या शांततापूर्ण निराकरणास प्रोत्साहन देत आहे आणि शांततापूर्ण समाधानाला पाठिंबा देण्यासाठी भारत सर्व काही करत राहील याचा पुनरुच्चार केला. दोन्ही नेत्यांनी संपर्कात राहण्याचे मान्य केले. (हेही वाचा: EPFO Ends Covid-19 Advances: 'इपीएफओकडू'न कोविड-19 ॲडव्हान्स समाप्तीची घोषणा; तुम्हाला या बाबी माहित असायला हव्यात, घ्या जाणून)
पहा पोस्ट-
Had a very productive meeting with President Volodymyr Zelenskyy. India is eager to further cement bilateral relations with Ukraine. Regarding the ongoing hostilities, reiterated that India believes in a human-centric approach and believes that the way to peace is through… pic.twitter.com/XOKA0AHYGs
— Narendra Modi (@narendramodi) June 14, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)