इराकमधील प्रमुख शहर बसरा येथील एका स्टेडियममध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान चेंगराचेंगरी झाली आहे. या घटनेमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर शेकडो जखमी झाले आहे. वृत्तसंस्था अल्जझीराने इराकच्या अंतर्गत मंत्र्यांच्या हवाल्याने सांगितले की, गुरुवारी झालेल्या चेंगराचेंगरीत साधारण 80 जण जखमी झाले. चार दशकांनंतर देशात झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सॉकर स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सहभागी होण्यासाठी प्रेक्षक जमले असताना ही प्राणघातक घटना घडली.
बसरा इंटरनॅशनल स्टेडियमबाहेर जखमी झालेल्या 80 जणांपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे इराकी न्यूज एजन्सीने म्हटले आहे. आठ देशांच्या अरेबियन गल्फ कपमधील अंतिम सामना इराक आणि ओमान यांच्यात होणार आहे.
Thousands of people were at the Basra International Stadium in the southern Iraqi city hours ahead of the Arabian Gulf Cup final match between Iraq and Oman on Thursday, triggering a deadly stampede. pic.twitter.com/fl2rBdLRwq
— Doha News (@dohanews) January 19, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)