इराकमधील शिया इस्लामी पक्ष इराकच्या वैयक्तिक कायद्यात सुधारणा करण्यासाठी संसदेवर दबाव आणत आहेत, ज्याद्वारे देशात मुलींच्या लग्नाचे वय 9 वर्षे होईल. एकीकडे भारत बालविवाहासारखे दुष्कृत्य संपवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे आणि त्यात काही प्रमाणात यश आले आहे, तर दुसरीकडे इराकला बालविवाह कायदेशीर करायचे आहे. मुलींचे कायदेशीर लग्नाचे वय कमी करण्यासाठी इराकमध्ये जोरदार प्रयत्न सुरू आहेत. येथे मुलींच्या लग्नाचे कायदेशीर वय सध्या 15 वर्षे आहे, ते कमी करून 9 वर्षे करण्याच्या योजनेवर काम केले जात आहे. इराकमधील शिया इस्लामवादी पक्ष ‘अल-जाफारी’, वैयक्तिक स्थिती कायदा (कायदा क्रमांक 188) मध्ये सुधारणा करण्याbabat आणि मुलींसाठी विवाहाचे स्वीकार्य वय सध्याच्या 18 वर्षे (धार्मिक मर्यादा 15 वर्षे आहे) वरून 9 वर्षे करण्याबाबत आग्रही आहे.

याबाबतच्या विधेयकाचा मसुदा अपक्ष खासदार रैद अल-मलिकी यांनी मांडला होता. हे विधेयक मंजूर झाल्यास इराकमध्ये बालविवाह कायदेशीर होईल. या विधेयकामुळे धार्मिक प्रमुखांना न्यायालयाऐवजी ‘शिया आणि सुन्नी सेटलमेंट कार्यालयांद्वारे’ विवाह निश्चित करण्याची परवानगी मिळेल. मात्र या नव्या कायद्याला इराकी जनतेने विरोध दर्शवला आहे. त्यांचा असा विश्वास आहे की, हा कायदा इराकमधील महिला आणि मुलांच्या हक्कांवर नकारात्मक परिणाम करेल. (हेही वाचा: New Degree In Marriage: घटत्या जन्मदराच्या पार्श्वभूमीवर चिनी विद्यापीठाने जाहीर केली 'विवाह' विषयातील नवीन पदवी)

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)