Indian Students Arrested In US: अमेरिकेतील न्यू जर्सी येथे शिकणाऱ्या दोन भारतीय विद्यार्थिनींना पोलिसांनी दुकानातून चोरी केल्याप्रकरणी अटक केली आहे. यातील 20 वर्षांच्या मुलीने पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला जाण्यापूर्वी हैदराबादमध्ये शिक्षण घेतले होते. तर दुसरी 22 मुलगी आंध्र प्रदेशातील गुंटूर येथील रहिवासी आहे. 19 मार्च रोजी या दोन्ही मुली पैसे न देता शॉपराईट या दुकानातून वस्तू घेऊन जात होत्या, मात्र ही बाब दुकान व्यवस्थापनाच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी होबोकेन पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर होबोकेन शहर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मुलींना समजावून सांगितले की, दुकानातून चोरी करणे हा गुन्हा आहे आणि यासाठी त्यांना न्यायालयात हजार केले जाऊ शकते.

यातील एका मुलीने चोरीच्या सामानासाठी दुप्पट पैसे मोजण्याची तयारी दर्शवली, तर दुसऱ्या मुलीने माफी मागून अशी चूक पुन्हा होणार नसल्याची ग्वाही दिली. मात्र पोलिसांनी त्यांना नियम समजावून सांगून अटक केली. (हेही वाचा: नेस्ले कंपनी वादात, लहान मुलांच्या खाद्यपदार्थांमध्ये साखरेचा समावेश; भारतासह दुर्बल देशांमध्ये विक्री- रिपोर्ट)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)