ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी भारत आणि हिंदू धर्माबाबत अनेकदा विधाने केली आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी एका खास मुलाखतीत सांगितले की, ‘माझी पत्नी भारतीय आहे आणि हिंदू धर्माचा अभिमान असल्याने  माझा भारत आणि भारतातील लोकांशी नेहमीच संबंध राहील. मला माझ्या भारतीय मुळांचा आणि भारताशी असलेल्या माझ्या संबंधांचा खूप अभिमान आहे.’ यंदा जी20 शिखर परिषदेसाठी सुनक भारतामध्ये येणार आहेत. ते म्हणाले, ‘2023 हे भारतासाठी मोठे वर्ष आहे. आम्ही भारतासोबत एकत्र काम करू आणि समोरच्या सर्वात मोठ्या आव्हानांना तोंड देऊ. पंतप्रधान मोदींसोबतची माझी भेट ही जागतिक आव्हानांवर चर्चा करण्याची संधी आहे आणि त्यांना तोंड देण्यासाठी ब्रिटन आणि भारताची मोठी भूमिका आहे.’ (हेही वाचा: Racial Online Posts: भारतीय वंशाचा Rapper Subhas Nair यास सिंगापूरमध्ये तुरुंगवासाची शिक्षा)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)