Gloucester A40 विमान आपत्कालीन स्थितीमुळे तातडीने उतरवण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे वजनाला अत्यंत हलके समजले जाणारे हे विमान ग्लॉसेस्टर (Gloucester) आणि चेल्तेनहॅम (Cheltenham) दरम्यान गोल्डन व्हॅली बायपासच्या मध्यवर्ती ठिकाणी उतरविण्यात आले. ही घटना गुरुवारी (10 ऑगस्ट) सायंकाळी 6.00 वाजण्याच्या सुमारास घडली. विमान उतरवताना सर्व आपत्कालीन सेवा घटनास्थळी उपलब्ध होत्या. ग्लुसेस्टरशायर कॉन्स्टेब्युलरीने सांगितले की, विमान अगदी आरामात आणि हळुवार उतविण्यात आले. जेणेकरुन आपत्कालीन स्थितीत उतरवूनही विमानातील कोणीही जखमी झाले नाही. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आम्हाला एक कॉल आला. त्यांनी कल्पना दिली की, ए 40 गोल्डन व्हॅलीवर हलके विमान आपत्कालीन स्थितीमुळे अचानक उतरवावे लागणार आहे. त्यानंतर लगेच आम्ही सज्ज झालो.
ट्विट
A light aircraft was forced to land on the central reservation of the A40 road Gloucestershire this afternoon.
No one was injured and it is understood that no other vehicles were involved
Full story: https://t.co/eYzy5IQUO9 pic.twitter.com/9PqTXmZsgy
— Sky News (@SkyNews) August 10, 2023
विमान उतरविण्यापूर्वी काही काळ पूर्ण बंद होता. ज्यामुळे स्थानिक ठिकाण असलेल्या M5 च्या A417 आणि J11 च्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्ण बंद झाली. विमान उतरवताना सर्व यंत्रणा सज्ज होती. विमान उतरविण्याबात माहिती मिळताच अवघ्या 10 मिनिटांमध्ये सर्व यंत्रणा सक्रीय झाल्या. मात्र, विमान उतरवताना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती, असेही ग्लुसेस्टरशायर कॉन्स्टेब्युलरीने सांगितले
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)