Matthew Perry Dead: इंग्रिजी भाषेतील सुप्रसिध्द फ्रेंडर्स मालिकेतील प्रसिध्द अभिनेता मॅथ्यू पेरीचा मृत्यू झाला आहे. कलाकारा विश्वात मोठी शोककला पसरली आहे. मॅथ्यूने मजेदार चँडलर बिंगच्या भूमिकेने जगभरात प्रसिद्धी मिळवली. या बातमीने केवळ हॉलिवूडमध्येच नव्हे तर जगभरात धक्का बसला आहे आणि कोट्यवधी फ्रेंड्सचे चाहते शोक करत आहेत. मॅथ्यू पेरी रविवारी पहाटे त्याच्या लॉस एंजेलिसच्या घरी हॉट टबमध्ये मृतावस्थेत आढळून आले. अहवालानुसार, घरात असतानाच त्याचा मृत्यू झाला, पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पेरीचा ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचे दिसते. पोलिसांना घटनास्थळावर कोणतेही ड्रग्स सापडले नाहीत. अभिनेत्याने अखेरचा श्वास घेण्यापूर्वी नेमके काय घडले हे अद्यप अस्पष्ट आहे.
We are devastated to learn of Matthew Perry’s passing. He was a true gift to us all. Our heart goes out to his family, loved ones, and all of his fans. pic.twitter.com/sAGMLmu5ki
— Warner Bros. TV (@warnerbrostv) October 29, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)