ई-बाईक सध्या ऑटो विश्वात भाव खात असल्या तरी त्यांच्या सुरक्षीततेबाबत मात्र नागरिकांमध्ये अद्यापही संभ्रम आहे. या संभ्रमात भर घालणारी आणखी एक घटना पुढे येत आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओ हा ई-बाईकचा स्फोट झाल्याचा असल्याचा सांगितले जात आहे. 1news ने दिलेल्या वृत्तानुसार, न्यू साउथ वेल्स फायर अँड रेस्क्यूने पुष्टी केली आहे की, सदोष बॅटरी चार्जिंगवर राहिल्यामुळे आग लागली. सत्तर लोकांना मॅड मंकी हॉस्टेल रिकामे करावे लागले. ज्या खोलीत आगल लागली त्यातून एकजण पळून जातानाही दिसतो आहे. या घटनेत एक व्यक्ती जखमी झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, हॉटेल कर्मचाऱ्यांनी काहीच वेळात ही आग नियंत्रणात आणली.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)