Digital Currency: चोवीस केंद्रीय बँकांमध्ये 2030 पर्यंत असतील डिजिटल चलने- BIS Survey

चीनमध्ये डिजिटल चलनाची पायलट चाचणी आता 260 दशलक्ष लोकांपर्यंत पोहोचलि आहे. इतर दोन मोठ्या उदयोन्मुख अर्थव्यवस्था, भारत आणि ब्राझील, पुढील वर्षी डिजिटल चलने सुरू करण्याची योजना आखत आहेत.

Digital Currency: चोवीस केंद्रीय बँकांमध्ये 2030 पर्यंत असतील डिजिटल चलने- BIS Survey
Digital Currency

बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्स (BIS) ने सोमवारी प्रकाशित केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले की, दशकाच्या अखेरीस जगभरातील उदयोन्मुख आणि प्रगत अर्थव्यवस्थांमधील सुमारे दोन डझन मध्यवर्ती बँकांमध्ये डिजिटल चलन असेल. सध्या जगभरातील मध्यवर्ती बँका किरकोळ वापरासाठी त्यांच्या चलनांच्या डिजिटल आवृत्त्यांचा अभ्यास करत आहेत आणि त्यावर काम करत आहेत. बहुतेक नवीन सेंट्रल बँक डिजिटल चलने (CBDCs) किरकोळ क्षेत्रात उदयास येतील.

याआधी स्विस नॅशनल बँकेने जूनच्या उत्तरार्धात सांगितले होते की, पायलट प्रकल्पाचा भाग म्हणून स्वित्झर्लंडच्या डिजिटल एक्सचेंजवर घाऊक CBDC जारी केला जाईल, तर युरोपियन सेंट्रल बँक 2028 मध्ये डिजिटल युरो पायलट सुरू करण्याच्या मार्गावर आहे. चीनमध्ये डिजिटल चलनाची पायलट चाचणी आता 260 दशलक्ष लोकांपर्यंत पोहोचलि आहे. इतर दोन मोठ्या उदयोन्मुख अर्थव्यवस्था, भारत आणि ब्राझील, पुढील वर्षी डिजिटल चलने सुरू करण्याची योजना आखत आहेत.

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 10, 2023 09:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).