अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील सर्वात मोठे शहर असलेल्या डेट्रॉईट येथे सकाळी 8:45 च्या सुमारास ट्रेनचे अनेक डबे रुळावरून घसरले. ही घटना डाउनटाउन डेट्रॉईटच्या पश्चिमेला सुमारे 30 मैल अंतरावर असलेल्या व्हॅन बुरेन टाउनशिपमधील मार्टिनव्हिल आणि हॅगर्टी रस्त्यांदरम्यानच्या हुरॉन रिव्हर ड्राइव्हच्या परिसरात घडली.

स्थानिक पोलिसांच्या हवाल्याने आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, एरियल फुटेजमध्ये किमान सहा गाड्या रुळावरून दिसल्या. अपघातामुळे ट्रॅकचे नुकसान झाले आणि अनेक गाड्यांच्या चाकांची मोठी हानी झाली.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)