दक्षिण आफ्रिकेचा रॅपर आणि गीतकार कोस्टा टिच याचा मृत्यू झाला आहे. जोहान्सबर्गमधील संगीत महोत्सवात परफॉर्म करताना तो मंचावरच कोसळला आणि त्याचा जाहीच मृत्यू झाला. तो केवळ 27 वर्षांचा होता. त्याच्या निधनाबद्दल दक्षिण आफ्रिकेच्या संसदेचे सदस्य ज्युलियस सेलो मालेमा यांच्यासह विविध कलाकार, संगीत नेटवर्क आणि राजकारण्यांनी शोक व्यक्त केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, घटना घडली तेव्हा कोस्टा टिच जोहान्सबर्गमधील अल्ट्रा साउथ आफ्रिका संगीत महोत्सवात कार्यक्रम करत होता. सोशल मीडियावर फिरत असलेल्या व्हिडिओंमध्ये तो स्टेजवर पडला तेव्हाचा क्षण दिसत आहे. ज्यावेळी तो मूर्च्छित झाला होता. नंतर पुढच्या काहीच क्षणांमध्ये त्याचा मृत्यू झाला.

ट्विट

ट्विट

ट्विट

कोस्टा टिच याचे मूळ नाव कोस्टा त्सोबानोग्लू होते. मात्र तो कोस्टा टिच या नावाने ओळखला जात असे. तो स्वातीनी आणि मोझांबिकच्या सीमेजवळील म्बोम्बेला येथील एक उदयोन्मुख कलाकार होता. त्याच्या सर्वात यशस्वी सिंगल, बिग फ्लेक्साला YouTube वर 45 दशलक्ष पेक्षा जास्त व्ह्यू मिळाले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)