Canada Plane Crashed: कॅनडामधील व्हॅंकुव्हरजवळ दुपारी चिलीवॅक, बीसी येथे छोटे विमान कोसळून दोन भारतीय प्रशिक्षणार्थी वैमानिकासंह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. या घटनेमुळे शहरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार,  विमान झाडावर आदळल्यानंतर विमानाचा अपघात झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेले दोन्ही प्रशिक्षणार्थी वैमानिक मुंबईतील असल्याचे वृत्त आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी मृतांची ओळख सांगितली नाही. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)