पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात शनिवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. पंजाबमधील सरगोधा जिल्ह्यातील भलवाल तहसीलमधील सरकारी कॉलेज ऑफ कॉमर्सजवळ वाहनाच्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यात सात जणांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले आहेत. रेस्क्यू 1122 नियंत्रण कक्षाने अपघाताची माहिती दिली आहे. सात जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले. तर 14 जण जखमी झाले असून त्यापैकी सात जणांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्वांना भालवल तहसील मुख्यालय (टीएचक्यू) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतांपैकी पाच जणांची ओळख पटलेली नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)