Baby Born With 4-Inch Tail: पूर्वी मानवालाही माकडांप्रमाणे शेपटी (Tail) असायची मात्र अलीकडेच चीनमध्ये (China) 4 इंच लांब शेपटी असलेल्या बाळाचा जन्म झाला, जो पाहून पालकांना धक्काच बसला. हे पाहून डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ही एक अत्यंत दुर्मिळ घटना आहे आणि हे एका विशेष स्थितीमुळे घडते. मेट्रोच्या रिपोर्टनुसार या मुलाचा जन्म हांगझोऊ चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये झाला आहे. न्यूरोसर्जन डॉ. ली यांनी त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि लिहिले- शेपटी असलेल्या मुलाचा जन्म हा असामान्य वाढीचा परिणाम आहे. जेव्हा काही अवयव खूप वेगाने विकसित होतात आणि प्रक्रिया थांबवता येत नाही तेव्हा असे घडते. जेव्हा पाठीचा कणा आसपासच्या ऊतकांशी असामान्यपणे जोडलेला असतो तेव्हा अशी शेपटी बाहेर येते. (हेही वाचा: Viral Video: मेट्रोच्या दरवाज्यात अडकला बेबी स्ट्रोलर, पाहा पुढे नेमकं काय घडलं)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)