ताजिकिस्तान (Tajikistan) आणि अफागाणिस्तानमध्ये (Afghanistan) भूकंपाचा धक्का बसला आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास ताजिकिस्तानमध्ये झालेल्या या भूकंपाची (Earthquake) तीव्रता 4.3 रिश्टर स्केल इतकी आहे. या भूकंपाचे धक्के अफगाणिस्तानमध्येही जाणवले. या भूकंपाची तीव्रता 4.1 रिश्टर स्केल मोजण्यात आली आहे. या भूंकपाचे केंद्र ताजिकिस्तान-अफागाणिस्तान सीमेजवळ आहे. गेल्या आठवड्यातही ताजिकिस्तानमध्ये भूकंपाचा धक्का बसला होता. (Earthquake In Tajikistan) यूएस जिऑलिजकल डिपार्टमेंटने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता ६.८ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली होती.
पहा ट्विट -
Earthquake of Magnitude 4.3 on Richter Scale strikes Tajikistan: National Center for Seismology pic.twitter.com/p9ld0FvMBE
— ANI (@ANI) February 28, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)