तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता काबीज केल्यानंतर महिलाविरोधी वृत्ती दाखवण्यास सुरुवात केली होती. गेल्या काही महिन्यांमध्ये तालिबानने महिलांवर अनेक निर्बंध लादले आहेत. आता अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने महिलांसाठी नवे फर्मान जारी केले आहे. आता अफगाणिस्तानमध्ये महिलांना सार्वजनिक ठिकाणी गाण्यावर, कविता वाचण्यास किंवा मोठ्याने काही वाचण्यास बंदी असेल. सर्वोच्च नेता हिबतुल्ला अखुंदजादा याच्या मंजुरीनंतर हे नियम लागू करण्यात आले आहेत. याआधी तालिबान शासकांनी नवीन कायद्यांनुसार महिलांना सार्वजनिक ठिकाणी बोलण्यास बंदी घातली आहे. नव्या कायद्यानुसार महिलांना आता तोंड झाकावे लागणार आहे. कायद्याचे पालन न केल्यास इशारा किंवा अटकेसारख्या शिक्षा दिल्या जातील. (हेही वाचा:
तालिबानचे अफगाणिस्तानमधील महिलांसाठी नवे फर्मान-
BREAKING:
Taliban bans the sound of women’s voices singing or reading in public. pic.twitter.com/wGs7mrcwE2
— Globe Eye News (@GlobeEyeNews) August 23, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)