वॉशिंग्टन डीसी येथील इस्रायल दुतावासाबाहेर एका व्यक्तीने स्वत:ला पेटवून घेतले आहे. सदर व्यक्ती यूएस वायुसेनेचा जवान असून सध्या तो सेवेत असल्याचे हवाई दल आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हा सैनिक स्वत: आरोन बुशनेल असल्याचे सांगतो. त्याने म्हटले आहे की, “मी यापुढे नरसंहारात सहभागी होणार नाही”.

दरम्यान, या सौनिकाचा स्व:ताला पेटवून घेण्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल आहे. हा व्हिडिओ आपण येथे पाहू शकता. (हेही वाचा, Indian National Dies: हार्लेनच्या आगीत 27 वर्षीय भारतीय नागरिकाचा मृत्यू, दूतावासाकडून मदतीचा हात)

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)