Viral Video: उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथील एनटीपीसी रिहंदच्या बिजपूरमध्ये ७ फूट लांबीची मगर दिसल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. आता वनविभागाच्या पथकाने मगरीची सुटका केली आहे. यावेळी मगर एका नाल्यात लपून बसली होती. वनविभागाच्या पथकाने काठ्याच्या साहाय्याने मगरीला पकडले. यानंतर मगरीला दोरीने बांधून रिहंद जलाशयातील इनटेक बेलमध्ये सोडण्यात आले. दरम्यान, रेस्क्यूचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हे देखील वाचा: Coldplay Mumbai Concert 2025: कोल्डप्ले कॉन्सर्टबाबत BookMyShow ने केली 500 कोटी रुपयांची फसवणूक; भारतीय जनता युवा मोर्चाचा आरोप, तक्रार दाखल

येथे पाहा, मगरीचा रेस्क्यू व्हिडीओ 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)