प्रवासादरम्यानस आपल्या निश्चित ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्यापैकी बहुतेकजण हा जवळच्या मार्गाचा वापर करण्यासाठी किंवा तो शोधून काढण्यासाठी गूगल मॅप हे टूल वापरत असतात. पण Google नकाशा कधी कधी असा काही भयंकर मार्ग दाखवतो की, त्या मार्गावर गेल्यानंतर पश्चाताप झाल्याशिवाय राहात नाही. याचा धक्कादायक अनुभव तामिळनाडू राज्यातील निलगिरी येथील एका व्यक्तीला नुकताच आला. या व्यक्तीने आपल्या निश्चित ठिकाणी जाण्यासाठी गूगल मॅपचा वापर केला आणि जवळचा रस्ता शोधला. ज्यामुळे त्याच्यावर मनस्तापाची वेळ आली.

सदर व्यक्तीला गूगलने रस्ता दाखवला पण तो रस्ता नव्हता तर मोठमोठ्या पायऱ्यांचा जिना होता. आता हा व्यक्ती त्या रस्त्यावर गाडी तर घेऊन आला होता. त्याला धड मागेही जाता येत नव्हते ना पुढेही. अखेर त्याने पोलिसांशी संपर्क साधला. स्थानिक पोलीस आणि नागरिकांच्या मदतीने या व्यक्तीची चारचाकी कशीबशी योग्य रस्त्यावर आणता आली. @nabilajamal या एक्स हँडलवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)