Whirlpool Layoffs 2024: व्हर्लपूल (Whirlpool) या होम अप्लायन्स कंपनीने खर्च कमी करण्यासाठी जागतिक स्तरावर 1,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी (Whirlpool Layoff) करण्यास सुरुवात केली आहे. युनायटेड स्टेट्समधील घरांच्या विक्रीत घसरण आणि मागणी कमी झाल्यामुळे व्हर्लपूलमध्ये टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. 30 जानेवारी 2024 रोजी, व्हर्लपूलचे मुख्य अधिकारी जिम पीटर्स यांनी सांगितले की कंपनीकडे व्यवसायाच्या काही भागांमध्ये कमी कर्मचारी असतील. इंडिया टीव्ही न्यूजच्या अहवालानुसार, 2023 पर्यंत, व्हर्लपूलमध्ये एकूण 59,000 जागतिक कर्मचारी होते. व्हर्लपूल टाळेबंदीमुळे 2024 मध्ये कंपमीचे 400 दशलक्ष डॉलर खर्च कमी होण्याची अपेक्षा आहे. (हेही वाचा :Tech Layoffs March 2024: टेक क्षेत्रातील नोकऱ्यांवर संकट! मार्चमध्ये Apple, Dell, IBM सह अनेक कंपन्यांनी केली नोकर कपात)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)