ट्विटरवर 'एडिट बटण' हे आजपर्यंत सर्वात जास्त विनंती केलेले फिचर आहे. आता लवकरच युजर्सना हा पर्याय उपलब्ध होणार आहे. म्हणजेच लवकरच युजर्स एखादे ट्विट पोस्ट केल्यानंतर ते संपादित करू शकतील. कंपनी लवकरच हे फिचर रोल आउट करेल. ट्विटरने सांगितले की, सध्या या एडीट बटणाची चाचणी सुरु असून, येत्या आठवड्यात ट्विटर ब्लू सदस्यांसाठी हे फिचर उपलब्ध होईल. ट्विटर ब्लू ही कंपनीची सशुल्क सदस्यता सेवा आहे जी निवडक देशांमध्ये उपलब्ध आहे. ही सेवा अद्याप भारतात उपलब्ध नाही.

हे फिचर व्यापकपणे उपलब्ध होण्याआधी लोक त्याचा कसा गैरवापर करू शकतात याची संपूर्ण माहिती कंपनी मिळवू इच्छित आहे. ट्विटर हे सार्वजनिक व्यासपीठ असल्याने, 'एडीट' फिचरने नवी भीती निर्माण केली आहे. कारण या पर्यायाच्या वापर फक्त चूकाच सुधारण्यासाठी नाही, तर या आधीच्या ट्रोलिंग घटना लपवण्यासाठीही केला जाऊ शकतो.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)