आज भारतामधून 2022 वर्षामधलं शेवटचं चंद्रग्रहण (Total Lunar Eclipse) दिसणार आहे. प्रामुख्याने पूर्वेकडील राज्यामधून खग्रास स्थिती चंद्रग्रहण पाहता येणार आहे तर उर्वरित भागात खंडग्रास स्थितीमधील चंद्रग्रहण दिसणार आहे. या ग्रहणा दरम्यानच ब्लड मून स्वरूपात म्हणजे लाल रंगात चंद्र दिसेल. भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 39 मिनिटांनी ग्रहणकाळ सुरू झाले आहे. त्याची खग्रास स्थिती 3 वाजून 46 मिनिटांनी सुरू होईल. भारतात हे ग्रहण केवळ पूर्वेकडच्या काही राज्यात ग्रहण संपण्याच्या काळात खंडग्रास स्वरुपात दिसू शकेल.

कुठे पहाल थेट प्रक्षेपण

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)