एलॉन मस्क यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला एक पोल ट्विट केलं होत ज्यात त्यांनी विचारल की मी ट्विटरचं प्रमुख पद सोडून द्यावं का? या पोलनुसार ट्विटरचे वापरकर्ते जे काही उत्तर देतील ते मला मान्य असेल. मस्क यांच्या या ट्विट नंतर सोशल मिडीयावर खळबळ माजली असुन लोक उत्सफूर्तपणे पोलला उत्तर देत आपली प्रतिक्रीया कळवत आहेत. तरी या पोलचा रिसल्ट आल्यानंतर आणि हा रिसल्ट एलॉन मस्क यांच्या विरुध्द आल्यास या जबाबदारीसाठी नवा उमेदवार मिळताचं मस्क हे पद सोडतील असं एलॉन मस्क म्हणाले होते. तरी मस्क यांच्या या ट्विटनंतर जगप्रसिध्द अमेरीकन युट्युबर मिस्टर बीस्टने मस्क यांना थेट सवाल विचारला आहे की मी तुमच्या नंतर ट्विटरचा सिईओ होवू शकतो का? तरी मिस्टर बीस्टने मस्कला विचारलेला हा सवाल सध्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरला आहे.
#MrBeast, the top YouTuber in the world, has expressed his interest in taking on one of the most vexing jobs in today's world -- #TwitterCEO.#Twitter #Elonmusk pic.twitter.com/SB3P2kE9xA
— IANS (@ians_india) December 23, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)