डेटा ब्रोकर उल्लंघनाच्या बाबतीत भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक प्रभावित देश आहे आणि गेल्या 20 वर्षांत 10 डेटा उल्लंघनांद्वारे भारतीय नागरिकांच्या 1.8 कोटी (18.7 दशलक्ष) पेक्षा जास्त वैयक्तिक रेकॉर्डशी तडजोड करण्यात आली आहे, असे एका अहवालातून समोर आले आहे. डेटा ब्रोकर हा एक व्यवसाय आहे जो विविध स्त्रोतांकडून माहिती एकत्रित करतो आणि इतर संस्थांना पुरवतो. डेटा ब्रोकरच्या उल्लंघनाबाबत भारताआधी अमेरिकेचा पहिला क्रमान आहे, जिथे नागरिकांच्या 207.6 दशलक्ष वैयक्तिक नोंदींमध्ये तडजोड झाली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)