अ‍ॅमेझॉनने आपल्या आणखी 9,000 कर्मचार्‍यांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे. कंपनीचे सीईओ अँडी जॅसी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना संदेश पाठवला आहे की, अ‍ॅमेझॉन कठीण काळातून जात आहे आणि खर्च वाचवण्यासाठी हे पाऊल उचलावे लागत आहे. ई-कॉमर्स दिग्गज कंपनीने कर्मचार्‍यांना काढून टाकण्याची ही पहिलीच वेळ नाही कारण यावर्षी जानेवारीत त्यांनी तब्बल 18,000 कामगारांना काढून टाकले. म्हणजे आता पर्यंत त्यांनी एकुण 27000 हजार कर्मचाऱ्यांना काढले आहे. (Disney Layoffs: डिस्ने करणार 4 हजार कर्मचाऱ्यांची कपात; कंपनीने व्यवस्थापकांना दिल्या सूचना)

Amazon पुन्हा हजारो कर्मचाऱ्यांना का काढत आहे? याचे स्पष्टीकरण कंपनीच्या सीईओने दिले आहे की अ‍ॅमेझॉनने गेल्या काही वर्षांत लोकांना जास्त काम दिले आणि आता, आर्थिक मंदीमुळे खर्च वाचवण्यासाठी आणि संसाधनांचा काळजीपूर्वक वापर करण्यासाठी कर्मचार्यांना काढून टाकावे लागेल. या निर्णयामुळे कंपनीला दीर्घकालीन मदत होईल आणि वाचवलेल्या पैशाचा वापर चांगल्या गोष्टींसाठी होईल, असेही त्यांनी सांगितले.

पहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)