भारतामध्ये अनेक शहरांमध्ये 5जी सेवा सुरु झाली असून, युजर्स त्याचा आनंद घेत आहेत. आता इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (ICEA) चे अध्यक्ष पंकज महेंद्रू यांनी सोमवारी सांगितले की, 2023 च्या अखेरीस लॉन्च होणारे 75-80 टक्के नवीन स्मार्टफोन 5G-सक्षम असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 ऑक्टोबर रोजी 5G सेवा सुरू केली. दूरसंचार सेवा प्रदात्यांनी निवडक शहरांमध्ये ही सेवा सुरू केली आहे आणि 2023 च्या उत्तरार्धात किंवा 2024 च्या सुरुवातीला संपूर्ण देश 5जीद्वारे कव्हर करण्याची योजना आहे. 5G सेवा सुरू होण्यापूर्वीच, जवळपास 80-100 दशलक्ष फोन हे 5G फोन होते. 2022 च्या अखेरीस भारतातील 5G सदस्यत्व सुमारे 31 दशलक्षांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा होती.
80% of new #smartphones will be #5G-enabled in India by 2023: ICEAhttps://t.co/HJGqNoyZha pic.twitter.com/A9nkFeVzXT
— Business Insider India?? (@BiIndia) December 26, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)