Worst Ball In IPL History: सनरायझर्स हैदराबाद (SRH) अष्टपैलू खेळाडू एडन मार्करामने राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध चालू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या सामन्यात एक विचित्र चेंडू टाकला. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर संघांमधील स्पर्धेतील क्वालिफायर 2 खेळला गेला. सामन्यात 13व्या षटकात ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर एडन मार्करामने भयानक चेंडू टाकला. एडन मार्करामने गोलंदाजी करत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. गोलंदाजी करताना त्याच्या हातातून चेंडू निसटला आणि तो शॉर्ट फाईन-लेगकडे वळला त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (हेही वाचा:ICC T20 World Cup 2024 All Squads: टी-20 विश्वचषक 2024 साठी सर्व 20 संघ जाहीर, एका क्लिकवर येथे पाहा संपूर्ण संघ आणि राखीव खेळाडू)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)