मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ प्लेऑफच्या मिशनसाठी आमनेसामने आहेत. या सामन्यात लखनौचा पराभव झाला, तर त्याचा प्लेऑफचा मार्ग खडतर असेल, पण मुंबईच्या मोहिमेला मोठा फटका बसणार नाही. मुंबईचे 12 सामन्यांत 14 गुण आहेत, तर लखनौचे 12 सामन्यांत 13 गुण आहेत. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. लखनौने काइल मेयर्सला आपल्या संघातून वगळले आहे. आवेश खानही नाही. नवीन-उल-हकचे संघात पुनरागमन झाले आहे. दीपक हुडाही संघात आला आहे. हेही वाचा IPL 2023: घरी पोहोचल्यानंतर विराट कोहलीने सिराजला दिले सरप्राईज, पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)