भारतीय संघाने आशियाई खेळ 2023 (Asian Games 2023) ची सुरुवात हांगझू येथे मोठ्या थाटात केली आहे. भारताने 24 सप्टेंबर रोजी पहिले पदक जिंकले आणि तेव्हापासून विजयाचा सिलसिला कायम आहे. 2018 च्या आशियाई खेळांमध्ये, भारतीय संघाने 570 सदस्यांच्या मजबूत तुकडीतून 70 पदके मिळवून आशियाई खेळांमध्ये सर्वाधिक पदकांचा स्वतःचा विक्रम रचला. आता या आवृत्तीत भारतीय संघाने मागील सर्वोत्तम कामगिरीला मागे टाकले आहे. आता भारतासमोर 100 हून अधिक पदके जिंकण्याचे लक्ष्य गाठण्याचे आव्हान आहे. महिला नेमबाजी संघाने 24 सप्टेंबर रोजी हांगझोऊ येथे भारतासाठी पदकाचे खाते उघडले होते. दरम्यान आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकांची लयलूट सुरुच आहे तसेच 81 पदकं जिंकत भारत चौथ्या स्थानावर आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)